An adult in Dharangaon died after falling from a running train जळगाव : धरणगाव येथील प्रौढाचा धावत्या रेल्वेतून पडल्याने जळगावनजीक मृत्यू झाला. ही घटना गुरूवार, 29 डिसेंबर रोजी पहाटे सहा वाजता उघडकीस आली. या प्रकरणी रामानंदनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. प्रमोद रूपचंद पाटील (45, पद्मालय नगर, धरणगाव) असे मयताचे नाव आहे.
धावत्या रेल्वेतून पडल्याने मृत्यू
धरणगावील प्रमोद पाटील हे आपल्या कामानिमित्त गेल्या दोन दिवसांपासून नाशिकला गेले होते. गुरूवार, 29 डिसेंबर रोजी सकाळी ते नाशिकहुन जळगाव येथे येण्यासाठी रेल्वेने प्रवास करीत असताना खंडेराव नगराजवळ सकाळी सहा वाजेच्या सुमारास धावत्या रेल्वेतून खाली पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक विनोद सुर्यवंशी आणि हरीष डोईफोडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. खिश्यातील कागदपत्राच्या आधारे मयताची ओळख पटली. खासगी वाहनाने मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. यावेळी नातेवाईकांनी गर्दी केली होती. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयताच्या पश्चात पत्नी बबिता आणि मुलगा कृष्णा असा परीवार आहे.