जळगाव। शहरातील जैनाबाद परिसरातील तरुण रेल्वेतुन पडून जखमी झाल्याची घटना सकाळी घडली. या घटनेत तरूणाचा पायाचा पंजा कापला गेला असून त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. गौरव सुभाष सोनवणे हे जखमी युवकाचे नाव आहे.
असोदा रोडने असलेल्या मोहन टॉकीजवळ गौरव राहतो. जखमी अवस्थेत भुसावळच्या मेन लाईनच्या डाऊन लाईनने असलेल्या 420/19 बेशुध्द अवस्थेत डिझल लाईट इंजिनवरील चालकाला दिसला. ही घटना शिवाजीनगर पुलाच्यापुढे असलेल्या पीडब्ल्युआय गोडावून समोर घडली. रेल्वतुन पडल्याने गौरव सोनवणे याचा पायाचा पंजा कापला गेला. ही माहीती डिझल लाईट इंजिनवरील चालकाने वॉकी टॉकीव्दारे पोलीसांना दिली. यानंतर पोहेकॉ अनिल नगराडे, मनोज पाटील, निलेश महाजन, रविंद्र ठाकुर यांनी घटनास्थळी धावत घेवून जखमीला जिल्हा रुग्णालयात हलविले. दरम्यान याचवेळी अहमदाबाद हावडा गेली होती. या गाडीतुन गौरव पडला की तो चालत्या गाडीत चढत होता हे कोडे उलगडले नाही.