धावत्या रेल्वेतून पडून नवविवाहित तरूणाचा मृत्यू

0

पाचोरा । शहरातील सोनार गल्लीत राहणारा नवविवाहीत मयत उमेश अर्जुन पाटील (वय 30) याचा सकाळी घरून पत्नीच्या माहेराला जातो असे सांगुन गेल्यावर धावत्या रेल्वेतुन पडुन मृत्यू झाला. मयत तरूणाचा मागील महिन्या अहिर सुवर्णकार मंगल कार्यालयात 21 मे रोजी विवाह झाला होता. उमेश हा शहरातील तुषार कुरिअरमध्ये नोकरीस होता. विद्युत महावितरण कंपनीतील सेवा निवृत्त लाईनमन अर्जुन पाटील यांचा मुलगा होता. त्याच्या पश्‍चात लहान भाऊ, बहीण आहे. मयत हा घरातील मोठा मुलगा व कर्ता होता त्याच्या अपघाती मृत्यूने परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.