धावत्या रेल्वेतून पडून मध्यप्रदेशातील तरुणाचा मृत्यू

0

रावेर- धावत्या रेल्वेतून पडून मध्यप्रदेशातील एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील पुनखेडा रेल्वे पुलानजीक सोमवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. खेलनसिंग गंगारामसिंग राठोड (25, पठारीया, जि.उमरीया, मध्यप्रदेश) असे मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत रावेर पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. रावेर-वाघोड दरम्यान पुनखेडा रेल्वे पुलानजीक खांबा क्रमांक 422/24 जवळ डाऊन रेल्वे लाईनीवर राठोड यांचा मृतदेह सोमवारी सकाळी 9.30 वाजता आढळला. कोणत्यातरी धावत्या रेल्वे गाडीतून पडल्याने डोक्याला जबर दुखापत होवून त्याचा मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले. मयताजवळ असलेल्या मोबाईलच्या सहाय्याने पोलिसांनी त्याची ओळख पटली. याबाबत अशोक धोंडू महाजन यांनी खबर दिल्यावरून रावेर पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अर्जुन सोनवणे पुढील तपास करीत आहेत.