धुक्यामुळे पुणे-निजामुद्दीन रेल्वेच्या तीन फेर्‍या रद्द

0

पुणे : सध्या देशभरात थंडीची भयंकर लाट पसरली असून, रस्त्यांवर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. काही शहरांमध्ये शाळांना दिवस सुट्टीदेखील जाहीर करण्यात आली आहे. धुके वाढत असून, पुढील संभावित धोका टाळण्यासाठी तसेच प्रवाशांची संख्या घटल्याने गाडी क्रमांक 04417, पुणे-निजामुद्दीन एसी विशेष गाडी रद्द करण्यात आली आहे. पुणे-निजामुद्दीन एसी विशेष गाडीच्या 16, 23 आणि 30 नोव्हेंबर, 2017 रोजीच्या तीन फेर्‍या रद्द करण्यात आल्या आहेत. सोमवारी पुणे ते संत्रागाचीदरम्यान चालणारी विशेष गाडी खडगपूरदरम्यान नॉन इंटरलॉकिंग असल्याकारणाने रद्द करण्यात आली आहे.