चोपडा : तालुक्यातील धुपे येथील 45 वर्षीय व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. कमरेच्या त्रासाला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलल्याचे समजते. ज्ञानेश्वर भगवान पाटील (45) असे मयताचे नाव आहे. या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
अकस्मात मृत्यूची नोंद
ज्ञानेश्वर भगवान पाटील (45, रा.धुपे, ता.चोपडा) हे आपल्या कुटुंबियासह वास्तव्याला असून गेल्या काही महिन्यांपासून त्यांना कमरेचा त्रास सुरू होता. औषधोपचार करूनही कोणताही आजारात फरक पडला नाही. ज्ञानेश्वर पाटील यांनी मंगळवारी मध्यरात्री राहत्या घरात कमरेच्या आजाराला कंटाळून छताला दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. याबाबत चोपडा ग्रामीण पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास सहाय्यक फौजदार देविदास ईशी करीत आहे.