जळगाव । शहरातील प्रताप नगरातील स्वामी समर्थ केंद्रातून देवदर्शन घेऊन घरी जाणार्या महिलेच्या हातातून मोटारसायकलवरून आलेल्या दोघांना धुकस्टाईलने मोबाईल चोरून नेला होता. याप्ररकणी स्थानिक गुन्हे शाखा पथकाने तपास चक्र फिरवित एका संशयित चोरट्याला मुद्देमालासह अटक केली आहे. दरम्यान, दुसरा चोरटा अद्याप फरार असून त्याचा शोध पोलिस घेत आहेत.
स्वामी समर्थ क्रेंदातून बाहेर पडल्यानंतर मोटारसायकलवरून आलेल्या दोघांना महिलेच्या हातातून मोबाईल हिसकवून धुम ठोकली होती. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होत. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा पथक पोलिस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत असतांना पोलिस निरीक्षक राजेशसिंह चंदेल यांच्या पथकातील सहायक फौजदार नरूद्दीन शेख, दिलीप येवले, विजय पाटील, अशोक चौधरी, सुरेश महाजन, चंद्रकांत पाटील, रवि घुगे, रामचंद्र बोरसे, दिनेश बडगुजर, नरेंद्र वारुळे अशांच्या पथकाने जळगाव, अमळनेर, धुळे या ठिकाणी मोटारसायकलवर येवून चोरी करणार्या चोरट्यांची माहिती संकलित केली. त्यानंतर या गुन्ह्यात शेख शकील शेख शरीफ वय-20, रा.शिवाजीनगर, वाजीद अय्युब रा.हजार खोलया, धुळे ह्या चोरट्यांचा सहभाग असल्याचे पथकाला निष्पन्न झाले. यानंतर आज मंगळवारी पथकाने शेख शकील शेख शरीफ यास सापळा रचून मुद्देमालासह अटक केली. त्यानंतर त्याला पूढील तपासासाठी जिल्हा पेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहे. याप्रकरणीचा पूढील तपास रवि नरवाडे हे करीत आहेत.