16 मतदान केंद्र संवेदनशील ; 32 गुन्हेगार तडीपार ; निवडणुकीत बाधा आणणार्यांवर होणार कारवाई
धुळे- शहरातील नागरीकांनी 9 डिसेंबर रोजी होत असलेल्या महापालिका निवडणुकीत निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहन राज्य निवडणूक आयुक्त जगेश्वर एस.सहारीया यांनी केले आहे. धुळ्यात शनिवारी सहारीया यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतर्फे करण्यात आलेल्या कामाचा आढावा घेतला. आढावा बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला . त्यांनी सांगितले की, धुळ्यात 450 मतदान केंद्र आहेत त्यापैकी 16 केंद्र संवेदनशील आहेत. त्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येईल. या पार्श्वभूमीवर 32 जणांना तडीपार करण्यात आले आहे. अवैध दारू विक्री व खरेदी करण्यावर कारवाई करण्यात येणार आहे. तपासणी नाके उभारून निवडणुकीत बाधा निर्माण करणार्या लोकांवर कारवाई करण्यात येईल. निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवाराला खर्च करण्याची मर्यादा पाच लाख रुपये आहे. त्यापेक्षा जास्त खर्च झाल्यास कारवाई करण्यात येईल. धुळे महापालिकेच्या निवडणुकीत शांतता व सुरक्षितेसाठी पोलीस विभागाने बंदोबस्त केला आहे. महापालिकेचे पाच हजार कर्मचारी महापालिकेच्या निवडणूक कार्यरत आहेत. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी सांगितले की शहरातील सर्व पोलिस ठाण्यातील अधिकारी-कर्मचार्यांना निवडणूक बंदोबस्तासाठी सूचना देण्यात आले आहे . त्यामुळे नागरिकांनी निर्भयपणे मतदान करण्यात करावे असे आव्हान त्यांनी यावेळी केली. धुळे महानगरपालिकेच्या 70 जागांसाठी ही निवडणूक होत आहे . यासाठी महापालिकेच्या वतीने 550 मतदान केंद्र तयार करण्यात आले आहे. 19 प्रभागातून 74 उमेदवार निवडून येणार आहेत .त्यासाठी निवडणूक आयोगाने तयारी पूर्ण केली आहे