धुळे । प्रतिनिधी । येथील स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे (एलसीबी) वरीष्ठ पोलीस निरिक्षक रमेशसिंह परदेशी यांनी मध्यरात्रीच्या सुमारास गोळी झाडून आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे.
सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून झाडली गोळी
पोलीस दलात अत्यंत शिस्तप्रिय व मनमिळावू म्हणून ओळख असलेल्या रमेशसिंह परदेशी यांनी पत्नी घरात असतानाच पोलीस क्वार्टरमध्येच बुधवारी रात्री 11.30 ते 12 वाजेच्या सुमारास स्वतःच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडली. या घटनेचे जिल्हा पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक यांच्यासह अन्य अधिकार्यांनी धाव घेतली. परदेशी यांनी कुठल्या कारणावरून आत्महत्या केली? याबाबत अद्याप कारण उघड झालेले नाही. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना व नातवंडे असा परीवार आहे.
पोलीस दलात हळहळ
स्थानिक गुन्हे शाखेचा पदभार घेताना परदेशी यांनी अनेक गुन्हे उघडकीस आणले होते त्यामुळे जिल्हाभरात त्यांची चांगली ओळख होती शिवाय मे महिन्यात ते सेवानिवृत्त होणार होते मात्र त्यापूर्वीच अप्रिय घटना घडली. पोलीस दलाकडून नेमक्या कारणांचा शोध घेतला जात आहे.