धुळे। अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांची प्रशासकीय कारणास्तव राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 6 च्या समादेशकपदी नेमणूक करण्यात आली आहे. तर पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य प्रशांत बच्छाव यांची चाळीसगाव येथे अपर पोलीस अधीक्षकपदी नेमणूक करण्यात आली आहे.
तसे आदेश गृह विभागाने काढले आहेत.राज्य पोलीस सेवेतील पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकार्यांच्या बदल्या नुकत्याच राज्याच्या गृहविभागाने केल्या होत्या. परंतु, काही प्रशासकीय कारणास्तव बदल्यांमध्ये फेरबदल करण्यात आले आहेत. राज्यातील 13 अधिकार्यांच्या नव्याने बदल्यांचे आदेश गृह विभागाचे कक्ष अधिकारी प्र.मो.बलकवडे यांच्या स्वाक्षरीने पारीत करण्यात आले आहेत.