सामाजिक वनीकरण रोपवाटीकेसमोरील घटना
शवविच्छेदनानंतर आज होणार अंत्यसंस्कार
चाळीसगाव । धुळे-औरंगाबाद महामार्ग बायपास रस्त्यावर तालुक्यातील खडकी बु. शिवारातील सामाजिक वनिकरण रोपवाटीकेसमोर शुक्रवार, 20 रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास रस्ता ओलांडतांना गर्भवती हरणीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने हरीण व पोटातील पिल्लाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अपाघाताची तिव्रता ईतकी मोठी होती की हरिणीच्या पोटातुन तिचे पिल्ले बाहेर आले होते.
शवविच्छेदन करुन अंत्यसंस्कार
घटनेची माहिती वनविभागाला मिळताच प्रादेशिक वनविभागाचे प्रवीण गवारे, प्रकाश पाटील यांनी घटनास्थळावर जावुन पंचनामा केला व हरीण आणि पिलाचा मृतदेह ताब्यात घेवुन शनिवार, 21 रोजी पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या हस्ते शवविच्छेदन करण्यात येवुन त्यांच्यावर अंत्यसंस्कार करणार असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.
पाण्यासाठी भटकंती
जिल्ह्यात तापमानाचा पारा चाळीशी पार गेला आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी वन्यप्राणी पाण्यासाठी भटकंती करतांना दिसून येत आहेत. पिण्याचे पाणी शोधत असतांना हे हरीण या रस्त्याकडे आले असावे असा अंदाज वर्तविला जात आहे.