धुळे- धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या प्रयत्नाने धुळे तालुक्यातील रस्ते चकाचक होणार असून आ.पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे पुरवणी मागण्यांमध्ये धुळे तालुक्यातील दोन रस्त्यांसाठी 291 कोटी 48 लक्ष रुपयाचा निधी मंजुर करण्यात आला आहे. या दोन रस्त्याचे अंतर एकूण 151 कि.मी. एवढे आहे. शासनाने पाठपुराव्याची दखल घेत निधी मंजुर केल्यामुळे आमदार पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचे तसेच सामाजिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आभार मानले आहेत. दरम्यान विकासाचा महत्वाचा दुवा असलेले रस्ते कामाला चालना दिल्यास ग्रामीण भागातील जनता शहराशी व परस्पराशी तत्काळ जोडली जातील. त्यामुळे उद्योग व्यवसायाबरोबरच विविध क्षेत्राला चालना मिळण्यास हातभार लागेल.
ग्रामीण भाग लवकरच शहराला जोडण्याचे लक्ष
तालुक्याचा सवार्र्ंगिण विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून आमदार कुणाल पाटील यांनी धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघात रस्ते, पाणी, विज, सिंचन, शिक्षणाबरोबरच रोजगार निर्मिती या कामांना प्राधान्य दिले आहे. दरम्यान विकासाचा महत्वाचा दुवा असलेले रस्ते कामाला चालना दिल्यास ग्रामीण भागातील जनता शहराशी व परस्पराशी तत्काळ जोडली जातील. त्यामुळे उद्योग व्यवसायाबरोबरच विविध क्षेत्राला चालना मिळण्यास हातभार लागेल. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवत तालुक्यातील रस्ते विकासाची कामे हाती घेतली. त्या अनुषंगाने तालुक्यातील विविध रस्ते कामासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करून महत्वाच्या रस्त्याच्या कामांसाठी निधी मंजुर करून घेतला. राज्य शासनाने शासनाने राज्यातील रस्ते व पूलांची कामे करण्यासाठी हायब्रीड अॅन्युईटी तत्वाचा स्विकार केला आहे. या तत्वानुसार पुरवण्या मागण्यांमध्ये धुळे तालुक्यातील मेहरगाव, निमडाळे, गोंदूर, भोकर, वलवाडी आणि पुढे धुळे जिल्हा हद्द असा एकूण 45 कि.मी. चा रस्ता नुतणीकरण व अद्ययावत होणार आहे या रस्त्यासाठी अंदाजित रक्कम 65 कोटी 52 लक्ष रुपये मंजुर झाले आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्र.6 ते अजंग, अंबोडे, नवलनगर, मोहाडी, कापडणे, राष्ट्रीय महामार्ग -3 वरून सरवड, नंदाणे, बुरझड, लामकानीला जोडून पुढे निजामपूर, ब्राम्हणवेल, कोंडाईबारी असा एकूण 106 कि.मी.अंतराचा रस्त्यासाठी अंदाजित रक्कम 225 कोटी 96 लक्ष एवढी रक्कम मंजूर झाली आहे.हायब्रीड अॅन्युईटी तत्वानुसार होणार्या या रस्त्यांना टोल लागणार नसून पंधरा वर्षे देखभाल दुरूस्तीचे काम संबधित ठेकेदार करणार आहे.या तत्वानुसार होणार्या कामाचे 40टक्के रक्कम सदर ठेकेदारास दोन वर्षात देण्यात येईल तर उर्वरित 60 टक्के रक्कम 15 वर्षात शासन व्याजासह देणार आहे.
पाठपुराव्याची दखल
धुळे तालुक्यातील एकूण 291 कोटी 48 लक्ष एवढया निधीतून एकूण 151 कि.मी.च्या रस्त्याचा विकास होणार आहे. या दोन रस्त्यामुळे तालुक्यातील सर्वात मोठा भाग परस्पराशी तत्काळ जोडला जाणार असून विकासाला चालना मिळणार आहे. पाठपुराव्याची दखल घेत तालुक्यातील रस्त्यांना मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस आणि सा.बां.मंत्री चंद्रकात पाटील यांचे आमदार कुणाल पाटील यांनी आभार मानले आहेत.