धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे नोटबंदीचा निषेध

0

धुळे । धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने बुधवारी धुळ्यात नोटबंदी विरोधात काळा दिवस मनवुन धरणे आंदोलन केले. यावेळी धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील, जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. भारिप बहुजन महासंघ धुळे यांच्या वतीने नोटबंदी दिवस लुटारूनचा दिवस म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोदी सरकार विरोधात घोषणा बाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला.