धुळे जिल्ह्यातील चार पोलिस ठाण्यांतर्गत गुरे चोरणारी टोळी धुळे गुन्हे शाखेच्या जाळ्यात

सहा आरोपींना बेड्या : टोळीचा राजस्थान राज्यातही उच्छाद

धुळे : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडासह थाळनेर, धुळे तालुका आणि दोंडाईचा पोलीस ठाणे हद्दीत मेंढपाळ बांधवांकडील पशूधन लांबवणार्‍या आंतरराज्य टोळातील सहा आरोपींच्या राजस्थान राज्यातून धुळे गुन्हे शाखेने मुसक्या बांधल्या आहेत. या टोळीविरोधात राजस्थान राज्यात देखील गुन्हे दाखल आहेत.

या आरोपींना पथकाने केली अटक
राजू हजारी बंजारा (33 कलम का कुवा, लाडपुरा, जि.कोटा), राजकुमार बलराम बंजारा (25, भोरका कुवा, झालकापाटण, जि.झालावाड, राजस्थान), महेंद्र चुनीलाल बंजारा (24, भोरका कुवा, झालकापाटण, जि.झालावाड, राजस्थान), शामराज परतीलाल बंजारा (26, बेलदार, भोरका कुवा, झालकापाटण, जि.झालावाड, राजस्थान), पृथ्वीराज हरीलाल बंजारा (30, कानपूरा, झालकापाटण, जि.झालावाड, राजस्थान) व मेंढी व्यापारी संतोष राजाराम बडगुजर (65, तिलक मार्ग, देपालपूर, जि.इंदौर, मध्यप्रदेश) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींच्या ताब्यातून चार मोबाईल, तीन लाखांची इनोव्हा (आर.जे.17 यु.ए.2001) असाा एकूण तीन लाख 24 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

यांनी आवळल्या टोळीच्या मुसक्या
पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील आणि अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील, उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, सहाय्यक उपनिरीक्षक संजय पाटील, कॉन्स्टेबल संदीप सरग, प्रकाश सोनार, कुणाल पानपाटील, रवीकिरण राठोड, उमेश पवार, पंकज खैरमोडे, महेंद्र सपकाळ, अमोल जाधव, सुनील पाटील, कैलास महाजन, गुलाब पाटील आदींच्या पथकाने केली.