धुळे जिल्ह्यातील दोन सहा.निरीक्षकांसह सहा उपनिरीक्षकांना पोलिस महासंचालक पदक

0

धुळे- जिल्ह्यातील सहा पोलिस उपनिरीक्षकांसह दोन सहाय्यक पोलिस निरीक्षकांनी गडचिरोली व गोंदिया या नक्षलग्रस्त भागात प्रत्येकी तीन वर्ष समाधानकारक सेवा बजावल्याने त्यांना पोलिस महासंचालक विशेष सेवा पदक मंजूर झाले आहेत.

या अधिकार्‍यांना मिळणार पदक
मोहाडीचे सहाय्यक निरीक्षक अभिषेक दिलीप पाटील, धुळे महिला तक्रार निवारण कक्षाच्या सहाय्यक निरीक्षक, सरीता मंजाबापू भांड, धुळे शहर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक शरद देविदास पाटील, चाळीसगाव रोड पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक पुरूषोत्तम आधार शिरसाठ, शिरपूर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक दीपक बाबूराव वारे, धुळे तालुका पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक गजानन अर्जुन गोटे, धुळे शहर वाहतूक शाखेचे उपनिरीक्षक दिनेश शिवाजी मोरे, साक्री पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक गणेश भगवान देवरे यांना पोलिस महासंचालक विशेष सेवा पदक मंजूर झाले आहे. पदक मंजूर झालेल्या सर्व अधिकार्‍यांचे जिल्हा पोलिस अधीक्षक विश्‍वास पांढरे व अपर पोलिस अधीक्षक डॉ.राजू भुजबळ यांनी अभिनंदन केले आहे.