धुळे जिल्ह्यातील ३६६ गावे दुष्काळसदृश

0

जिल्हाधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे यांनी जाहीर केली यादी

धुळे । महसूल व वनविभाग यांचा १० फेब्रुवारी २०१७ च्या शासन निर्णयानुसार २०१६- २०१७ च्या खरीप हंगामातील ज्या गावांची अंतिम आणेवारी ५० पैसे वा त्यापेक्षा कमी आलेली आहेत ती गावे दुष्काळसदृश गावे म्हणून जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी जाहीर केले आहे. प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये त्यांनी ही माहिती दिली आहे. या आदेशानुसार धुळे जिल्ह्यातील ३६६ गावे दुष्काळ सदृश जाहीर करण्यात आले आहे. यात धुळे तालुक्यातील ९७, साक्री १२६, शिंदखेडा तालुक्यातील १३२ गावांचा समावेश आहे. जमीन महसूलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू वीज बिलात ३३.५ टक्के इतकी सूट, शालेय/ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयोअंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, टँकरद्वारे पाणी पुरविणे, शेतकर्‍यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे आदी सवलतींचा लाभ मिळणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे यांनी नमूद केले आहे.

दुष्काळी सवलतींचे मिळणार लाभ
धुळे तालुक्यातील गावे
देवपूर, महिंदळे, वलवाडी, अवधान, मोहाडी प्र.ल., खेडे, सुटेपाडा, मोराणे प्र.ल., कुंडाणे, उडाणे, सांजोरी, वार, नकाणे, निमडाळे, गोंदूर, भोकर, रावेर, चितोड, फागणे, बाळापूर, वरखेडे, अजंग, काळखेडे, नंदाळे खु., कासविहीर, आंबोडे, मळाणे, नगाव खु., नवलनगर, नावरा, नावरी, सातरणे, वणी, आर्णी, वडगाव, सोनगीर, दापुरी, दापुरा, देवभाने, सरवड, कापडणे, धनूर, लोणकुटे, कौठळ, मोहाडी प्र.डां., हेंकळवाडी, तामसवाडी, रायवट, काळी, कानडामाना, नूरनगर, मळी, कसाड, भदाणे, खंडलाय बु., खंडलाय खु., देऊर बु., देऊर खु., उभंड, नांद्रे, पिंपरखेडे, शिरधाने प्र.नेर, बांभुर्ले प्र.नेर, लामकानी, सैताळे, रामी, बेहेड, बोरसुले, नवे कोठरे, बोरीस, निकुंभे, बुरझड, वडणे, नंदाणे, सायने, चिंचवार, नवलाणे, मुकटी, भिरडाई, चिंचखेडा, सावळी, सावळी तांडा, भिरडाणे, अंचाळे, अंचाळे तांडा, आमदड, वजीरखेडे, वेल्हाणे, कुंडाणे वेल्हाणे, गाडउतार, नरव्हाळ, पिंपरी, वडजाई, सौंदाणे, बाभूळवाडी आदी गावांचा समावेश आहे.

साक्री तालुक्यातील गावे
साक्री, अंबापूर, भाडणे, गोंदास, दातर्ती, गंगापूर, कावठे, पेरेजपूर, सालटेक, छडवेल, अष्टाणे, कोकले, नागपूर को., नांदवण, शेवाळी, महिर, कळंभीर, धमनार, अक्कलपाडा, सय्यदनगर, इच्छापूर, तामसवाडी, कासारे, मालपूर, नवडणे, सायने, धाडणे, शेणपूर, दिघावे, गणेशपूर, उंभर्टी, छाईल, प्रतापपूर, नाडसे, दारखेल, बेहेड, विटाई, निळगव्हाण, म्हसदी प्र.नेर, वसमार, चिंचखेडे, ककाणी, भडगाव, काळगाव, शेवाळी, झिरणीपाडा, चिपली, बासर, उंभरे, धवळीविहिर, कुत्तरमारे, टिटाणे, इसर्डे, पन्हाळी, पेटले, जामदे, खोरी, कोर्डे, काळटेक, पचाळे, सिनबन, विटावे, निजामपूर, भामेर, रायपूर, शिवाजीनगर, जैताणे, खुडाणे, आखाडे, फोफादे, भागापूर, वाजदरे, रुनमळी, वासखेडी, वर्धाने, दुसाणे, बळसाणे, सतमाने, कढरे, इंदवे, ऐचाळे, हट्टी खु., लोणखेडे, छावडी, आमोदे, म्हसाळे, हट्टी बु., घाणेगाव, फोफरे, नागपूर, उभंड, आयने, मळखेडे आदी गावांचा समावेश आहे.

शिंदखेडा तालुक्यातील गावे
भडणे, परसामळ, कुमरेज, वरुळ, घुसरे, सोनशेलू, वर्शी, दभाशी, तावखेड प्र.बे., सुकवद, निरगुडी, टेंभलाय, होळ प्रबे, दसवेल, धांदरणे, डाबली, विटाई, दत्ताणे, गव्हाणे, शिराळे, अजंदे खु, खलाणे, निशाणे, वायपूर, सार्वे, चांदगड, महाळपूर, बाभुळदे, दरखेडा, चिरणे, कदाणे, अलाणे, वाघाडी बु, वाघाडी खु, बाभळे, दलवाडे प्रन., जोगशेलू, चौगाव बु, चौगाव खु, विखरण, कामपूर, रहिमपुरे, वणी, कुरुकवाडे, विखुर्ले, खर्दे बु, मांडळ, अंजनविहिरे, चिमठाणे, पिंप्री, दलवाडे प्रसो, आरावे, जखाणे, तामथरे, अमराळे दराणे, रोहाणे, मुकटी, चिमठावळ, डांगुर्णे, सोंडले, नरडाणा, पिंप्राड, गोराणे, कलमाडी, पिंपरखेडा, कमखेडा, हुंबर्डे, मेलाणे, कंचनपूर, डोंगरगाव, बेटावद, पढावद, मुडावद, भिलाणे, म्हळसर, वडोदे, अजंदे बु, वाघोदे, वालखेडा, हातनूर, साळवे, मेथी, वरझडी, दिवी, सतारे, अक्कलकोस, कलवाडे,कुंभारे प्र. न., लोहगाव, वसमाने, शिंदखेडा, अक्कडसे, वरपाडे, नेवाडे, सोनेवाडी आदी गावांचा समावेश आहे.