भामेर । दरमहा मानधन योजनेसाठी जिल्ह्यातून केवळ 60 वारकर्यांची (50 वर्षावरील) निवड करण्यात येते. ती संख्या वाढवून 500 व तालुक्यातून 300 अशी करण्याची मागणी शाहीर कलावंत वारकरी अधिवेशनात करण्यात आली. येथील म्हसाई माता मंदिर परिसरात दोन दिवस चाललेल्या या अधिवेशनाची रविवारी उत्साहात सांगता झाली. या अधिवेशनात जिल्ह्यातील शिंदखेडा व साक्री तालुक्यातील पदाधिकार्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. साक्री तालुकाध्यक्षपदी निजामपूर येथील रहिवासी हभप निंबा गोपाळ चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली. याप्रसंगी जि.प.सदस्या उषा ठाकरे, अप्पा खताळ, जेष्ठ शाहीर भटू गिरमकर, भिकन जयस्वाल, लक्ष्मीकांत शाह आदी उपस्थित होते.
कलावंताद्वारे कलागुण सादर
या दोन दिवस चालेल्या अधिवेशातन कलावतांनी मागण्यांसह मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर केले. अधिवेशनस्थळी या कलाकारांनी आपले कलागुण सादर करून वाहव्वा मिळविली. यात त्यांचे श्रद्धास्थान असलेल्या यशोदा अक्का यांच्यासह गायक, वादक, कीर्तनकार, गोंधळी व भारूडाकार यांचा समावेश होता. सुत्रसंचालन प्रदेशाध्यक्ष अनिल जगताप, हभप निंबा चौधरी यांनी केले.
भक्तीमय वातावरण तयार
संध्याकाळी निजामपूर – जैताणे गावामधून शोभायात्रा काढण्यात आली. त्यामुळे भक्तीमय वातावरण तयार झाले होते. म्हसाई माता मंदिर परिसरात झालेल्या अधिवेशनास्थळी रात्री 18 गावामधील वारकरी कलाकार व गोेंधळीनी ही रात्र शाहीर वारकरी कलावंतांची या सांस्कृतिक कार्यक्रमा कलागुणांचे सादरीकरण केले. त्यासाठी प्रत्येक दिंडीला 10 मिनीटांचा कालावधी देण्यात आला होता. या अधिवेशनाला उत्तर महाराष्ट्रातील चारही जिल्ह्यामधील 61 गावामधू तब्बल 2 हजार 170 पुरूष व महिला वारकरी उपस्थित होते.
कलावतांना न्याय द्या
मानधनासाठी यंदा 500 अर्ज आले असतांना शासनाने केवळ 157 वारकर्यांची निवड केली आहे. त्यामुळे या अधिवेशनात ही संख्या वाढविण्याची मागणी पुढे आली आहे. वारकर्यांना दरमहा दीड हजार मानधन दिले जाते. शासनाने या मागणीचा विचार करून वारकर्यासह कलावंतांना न्याय द्यवा, अशी अपेक्षा व्यक्त केली. शनिवारी मथुरा येथील राष्ट्रसंत श्री इंद्रदेवेश्वर सरस्वती महाराज यांच्या हस्ते या अधिवेशनाचे उद्घाटन झाले. त्यांनी अत्यंत उद्बोधक प्रवचन केले.