धुळे जिल्ह्यात उर्दू अंगणवाड्या सुरू करण्याची मागणी

0

धुळे। जिल्हा परिषद शाळा असलेल्या ठिकाण उर्दू अंगनवाड़या सुरू करण्याची मागणी अल्पसंख्याक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष ताहीरबेगमिरजा व लोकसेवा फाउंड़ेशनचे अध्यक्ष रफीकशेख व सचिन अबरारशेख यांनी महिला बाल कल्याणमंत्री पंकजा मुंढे याच्याकड़े केली आहे.

साक्री तालुक्यात सहा धुळे तालुक्यात नऊ शिदखेंड़ा तालुक्यात पाच आणि शिरपुर तालुक्यात चार उर्दू शाळा चा समावेश आहे. माञ 24 जिल्हा परिषद उर्दू शाळेत केवळ 6 उर्दू अंगणवाड़या आहेत. साक्री तालुक्यातील निजामपुर येथे 2 कासारे येथे 2 जैताणे,येथे 1 व साक्री येथे 1 असे एकुण 6 उर्दू अंगणवाड़ी समावेश आहे.