निजामपुर । धुळे जिल्ह्यात पंचायत राज समिती चा दि 5 ते.7 जुलै रोजी तीन दिवसाचा दौरा असुन कर्मचार्यांमध्ये धावपळ सुरू झाली असुन सर्व कर्मचारी व अधिकारी सज्ज झाले आहेत. यात ग्रामपंचायत विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद पंचायत समिती कर्मचारी व अधिकारी कामाला लागले आहे. पंचायत राज समिती ही सर्व कार्यालयाचे दप्तर, बांधकामे, शासनाकड़ुन आलेला निधी हा निधी विकासकामा साठी खर्च केला याची तपासणी करण्यात येणार आहे. गावातील स्वच्छता, शौचालय, साफसफाई, शाळेत शालेय पोषण आहार, बांधकामे, शाळेतील रेकॉर्ड पाहणार आहे. तसेच आरोग्य केद्र, प्राथमिक आराग्य केंद्र, ग्रामीण रुगणालयाची पाहणी करण्यात येणार आहे. याकालावधीत कर्मचार्यांना रजा घेता येणार नाही. कमिटीने सर्व तपासणी केल्या नंतर समाधान वाटले नाही किंवा गंभीर बाब निदर्शनास आल्यास कर्मचारी ला जागेवर निलंबित करण्याचा आदेश शासनाने दिलेला आहे. पंचायत राज समिती धुळे जिल्हात येत असल्याने कर्मचारी व अधिकारीचे धाबे दणाणले आहे.
विविध योजनांच्या कामाची पाहणी
ही समिती इंदिरा आवास योजना, प्रधान मंत्री आवास योजना, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना, रमाई आवास योजना, जनसुविधा योजना, पाणलोट विकास योजना, निर्मल भारत, राष्ट्रीय बायोगॅस योजना, विशेष घटक, दलित वस्ती सुधारणा योजना 14 व्या वित योजनेची तसेच आमदार व खासदार निधी व शासनाकड़ून आलेले विविध योजनेची कामाची पाहणी करण्यात येणार आहे. शासनाकडून आलेला निधी योग्य ठिकाणी वापरली किंवा नाही कामाचा दर्जा पाहिणी करणार आहेत. यासमितीमध्ये विधानसभा व विधान परिषदचे आमदार असणार आहे. समिती गावात येत असल्यामुळे गावाची सापसफाई कामे सुरू झाली आहे. कर्मचारी आपला रेकॉड बनविण्यात मग्न झाले आहेत.