धुळे : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली आहे.प्रचंड उष्म्याने जीवाची लाहीलाही होत आहे.दि.7 रोजी सकाळीच ढगाळ हवामान निर्माण झाले होते.त्यामुळे पावसाचे आगमन होण्याची चिन्हे दिसून आली होती. सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास वातावरणात बदल होऊन अचानक पावसाच्या सरी कोसळल्या. तर जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी पावसामुळे झाडे उलमडून पडली होती.
झाडे रस्त्याच्या मधोमध पडल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती. नरडाणा बेटावद रस्त्यावर झाडे पडल्यामुळे दोन ते अडीच तास रस्ता बंद पडला होता.शहरात मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे काही भागात पाणी साचले होते. पावसामुळे शहरातील बहुतेक भागातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. सोनगीर,नरडाणा,शिरपूर,शिंदखेडा या भागातदेखील पावसाने जोरदार हजेरी लावली. लोकांना उकाळ्यापासून सुटका झाल्याचे आंनद व्यक्त होत आहे. मात्र काही ठीकाणी वादळामुळे शेतकर्यांचे केळी पिकांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे.