धुळे जिल्ह्यात वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस

0

धुळे । शहरासह जिल्ह्याभर मंगळवारी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास वादळी वारा व विजेच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे कापूस पिकाचे मोठे नूकसान झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्हाभरात ढगाळ वातावरण होते. परीणामतः थंडीही कमी झाली होती. आज सायंकाळी 4 वाजेपासूनच वातावरण अधिकच गडद झाले होते. अचानक वादळीवारा सूरू झाला व विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरूवात झाली. दहा मिनिटे झालेल्या पावसामुळे रस्ते जलमय झाले. पावसामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी विज पूरवठा खंडित झाला होता. दरम्यान पाऊस बंद झाला तरी विजेचा कडकडाट व ढगांचा गडगडात सुरू होता. शिरपूर, शिंदखेडा, साक्री तालुक्यात ही पावसाने काही ठिकाणी जोरदार हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यावर पुन्हा संकटाचे सावट उभे ठाकले असल्याने शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे.