धुळे । धुळे शहरासह जिल्ह्यात आषाढी एकादशीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात मुख्यत्वेकरून विठ्ठल-रूखमाईचा रथोत्सवाचा समावेश आहे. विठ्ठल-रूखमाईच्या नावाच्या गजरात मोठ्या उत्सहात आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. विठ्ठल नामाच्या जयघोषात लहानांपासून जेष्ठ नागरिक तल्लीन झाले होते. रथोत्सवामुळे तरूणाईत उत्साह संचारला होता. काही तरूणांनी मोबाईलमध्ये रथोत्सवाचे शुटींग केले तर काहींना सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही.
निजामपूर येथे तहसीलदारांच्या हस्ते पुजा
निजामपुर । साक्री तालक्यातील माळमाथा परिसरातील निजामपुर येथे प्रति पंढरपूर म्हणुन ओळख असणार्या निजामपुर गावात विठ्ठल रखुमाई मंदिरात आषाढी एकादशी उत्सव मोठ्या थाटात साजरा होत करण्यात आला. येथे विठ्ठल राखुमाईचा रथ गावातून मिरवण्याची प्रथा आहे. या रथास 197 वर्षांची परंपरा आहे. रथ पाहण्यासाठी माळमाथा परिसरातील भाविक येत असतात. याही वर्षी हजारोच्या संख्येने भाविक दर्शनासाठी आले होते. दरम्यान सालाबादप्रमाणे याही वर्षी साक्रीचे विद्यमान तहसीलदारांच्या हस्ते पुजा आरती करण्यात आली. साक्री तालुक्यातील माळमाथा परिसरातील निजामपुर जैताणे गावी आषाढी उत्सवाची परंपरा इ स 1804 पासून सुरू आहे 203 वर्षापासून सुरू आहे दरवर्ष गावात विठ्ठल रखुमाई ची गावात रथावर मिरवणुक निघत असते.
पिंपळनेरात भक्तिमय वातावरण
पिंपळनेर । विठ्ठलाच्या भक्तीत पिंपळनेरवासी दंग झाले. अभिषेक, महापूजा, कीर्तन, भजन अशा विविध धार्मिक कार्यांनी मंगलमयी वातावरणात आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. येथील पुरातन विठ्ठल मंदिर संस्थानात सकाळी विष्णू सहस्रानाम पठण त्यानंतर 9 वाजता श्री विठ्ठलाच्या मूर्तीस अभिषेक महापूजा करण्यात आली. 12 वाजता आरती करण्यात आली व महिलांचे भजन व हरिपाठ झाले. संध्याकाळी भजन व आरती नंतर मूर्ती दर्शनासाठी खुली करण्यात आली.
भाविकांना फराळ वाटप
शिरपूर । तालुक्यातील निमझरी येथील प्रतिपंढरपूरात विठ्ठल रूक्मणीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांकरिता स्वाभिमान प्रतिष्ठानाने 125 किलो फराळाचा नायलोन चिवडा भाविकांना वाटप करण्यात आला तसेच ईश्वर चौधरी यांनी शिरपूरात हाँटेल लोकेश मध्ये चहापाण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी प्रतिष्ठाना चे अध्यक्ष विजय बाफना , उपाध्यक्ष एस.कुमार माळी , मनोज संकलेचा , रमेश बाफना , दुर्गेश चौधरी , मुकेश बाफना , संजय कुंभार ,छोटू मिस्तरी , दिनेश कदम , गणेश कोचर , रोनक कोचर याकामी आदींनी सहकार्य केले
तर्हाडीत वृक्षदिंडीने वेधले लक्ष ; बालवारकरी भजनात झाले तल्लीन
तर्हाडी । येथील सिंधूताई इंग्लिश मेडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीनिमित्त वारकर्यांची वेषभूषा करून वृक्षदिंडी काढली. या दिंडीतून वृक्षरोपणाचा व हिंदू संस्कृतीची जपणूक व्हावी असा संदशे देण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष सुधीर भामरे, कार्याध्यक्ष सुभाष भामरे, प्राचार्या उज्वला भामरे, मुख्याध्यापक एन. एच. कश्यप यांच्या हस्ते दिंडी पूजर करून दिंडीस प्रारंभ झाला. या दिंडीत सहभागी सर्व विद्यार्थी व शिक्षकांना रावसाहेब भगवान कदम यांच्यातर्फे फराळाचे वाटप करण्यात आले. यशस्वीतेसाठी भारती पाटील, दिपाली भामरे, प्रियंका भलकार, संगिता साळुंखे आदींनी कामकाज पाहिले.
विठ्ठलमंदिरात भाविकांची गर्दी
धुळे । आषाढी एकादशीनिमित्त शहरातील मालेगावरोडवर असणार्या विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी उत्साहात साजरा करण्यात आली. प्रारंभी मंगळवारी पहाटे चार वाजता विठ्ठलाच्या मूर्तीवर दूधाने अभिषेक करण्यात आला. त्यानंतर काकडा आरती झाली. पहाटे विठ्ठलाची महापूजा झाल्यानंतर भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती. मंगळवारी दिवसभर शहरातील काही मित्र मंडळातर्फे मंदिरात साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले. गल्ली क्रमांक चारमधील विठ्ठल रुख्मिणी मंदिरातर्फे सकाळी दिंडी काढण्यात आली.
निमझरीत आमदारांच्याहस्ते पुजन
शिरपूर । तालुक्यातील प्रति पंढरपूर म्हणून मानल्या जाणार्या बाळदे येथे आमदार काशिराम पावरा यांच्या हस्ते विठ्ठलाची पूजा करण्यात आली. बाळदे व निमझरी येथील विठ्ठलाच्या मंदिरात आमदार काशिराम पावरा, प्रांतधिकारी नितीन गावंडे, तहसिलदार महेश शेलार, जि. प. उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, जि.प. सदस्या कल्पना राजपूत, प्रभाकर चव्हाण, अशोक कलाल, तालुका कृषी अधिकारी उज्वलसिंग गिरासे, पं.स. उपसभापती संजय पाटील, वासुदेव देवरे आदींच्या हस्ते पूजा करण्यात
आली.
एसआरबी इंटरनॅशनल स्कूल
दहिवद येथील चोपडा फाट्यावर स्थित असलेल्या एसआरबी इंटरनशनल स्कूलमध्ये चिमुकल्यांनी विठ्ठल रूखमाईचे रूप घेतले होते. आषाढी एकादशीनिमित्त स्कूलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. काही विद्यार्थी विठ्ठल रूखमाई तर काही वाकर्यांची वेशभूषाकरून आले होते. यावेळी त्यांनी हरीनामाचा जयघोष करीत दिंडी काढली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष तुकाराम बाविस्कर, उपाध्यक्षा भाग्यलक्ष्मी बाविस्कर, चेअरमन डॉ. धीरज बाविस्कर, संचालिका मानसीस बाविस्कर, माधुरी मंडाले उपस्थित होते.
शिंदखेड्यात भर पावसातही भाविकांची दर्शनासाठी गर्दी
शिंदखेडा । शिंदखेडा तालुक्यातील दत्तवायपुर येथे रिमझिम पावसातही परिसरातील भाविकांनी मनोभावे दशर्नी घेऊन पालखी सोहळ्यात सहभाग घेतला. दत्तवायपुर येथे विठ्ठल मंदीरा मध्ये आषाढी एकादशी निमित्ताने पहाटे पांडुरंगाचे स्नान करून महापुजा करण्यात आली. त्यानंतर परिसरातील भाविकानसाठी दर्शनाकरिता खुले करण्यात आले. रिमझिम पावसातही परिसरातील शेकडो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. गावात ही आशा रिमझिम पावसातही पालखी सोहळामध्ये टाळ मृदगं , अभंग, भारूड,च्या गजरात सोहळा साजरा करण्यात आला. तसेच पालखी सोहळ्यामध्ये महीला वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दिसुन आली. यात्रा निमित्ताने गावात एक भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. यात्रोत्सवास मध्ये परिसरातील व्यावसायिक कटलरी दुकाने थाटुन एक दिवसीय विक्री करण्यासाठी दाखल झाले होते. ह.भ.प चंद्रकांत महाराज यांचा जाहीर किर्तनाचा कार्यक्रम विठ्ठल मंदिर परिसरात घेण्यात आला.