धुळे जिल्ह्यात शेतकर्‍यांमध्ये उदासिनता

0

धुळे । शेतकरी पिक विमा भरण्यासाठी शासनाने दिलेल्या निर्देशानूसार दि.31 जुलै अंतिम मुदत असल्याने रविवारी महाराष्ट्रासह धुळे जिल्ह्यात देखील राष्ट्रीयकृत तसेच जिल्हा बँक सुरू होत्या. परंतू पिक विमा भरण्यासाठी जिल्ह्याभरातील शेतकर्‍यांनी पाठ दाखविली. तर साक्री तालुक्यात काही प्रमाणात शेतकर्‍यांनी पिक विमा फार्म भरण्यासाठी काही अंशी चांगला प्रतिसाद दिला आहे. शिरपूर तालुक्याची स्थिती पाहता दिवसभर शहरात काही राष्ट्रीयकृत बँका सुरू होत्या मात्र शेतकर्‍यांचा प्रतिसाद दिसून आला नाही. तर शिंदखेडा तालुक्यात बर्‍यापैकी शेतकर्‍यांनी फॉर्म भरल्याचे समजते.

तहसीलदारांकडे माहितीच उपलब्ध नाही
शासकीय कार्यालय म्हणून तहसील कार्यालय महत्वाचे मानले जाते. या ठिकाणी तालुक्यातील माहिती मिळत असते. मात्र पीक विमा भरण्याची माहिती तहसिलदार सींप भोसले यांना विचारली असता या ठिकाणी पिक विमा संदर्भात कुठलीही माहिती उपलब्ध नसल्याचे सांगितले. बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेत संपर्क साधला असता 3 वाजेपर्यंतच बँक चालू होती. मात्र पिक विमा अर्ज भरण्यासाठी आलेल्या शेतकर्‍यांची माहिती मिळून आली नाही. बँकेतील कृषी विमा योजनेची माहिती युनियन बँकेचे अधिकारी व्यवस्थापक राहुल सागर, अनिकेत साळुंखे यांनी माहिती दिली. तर भारतीय स्टेट बँकेचे अधिकारी कल्पेश कोठारी यांनी माहिती दिली. साक्री तालुक्यात पिंपळनेर पश्‍चिम पट्ट्यात सोयाबीन, नागली, तांदूळ, मका या पिकांचा विका अर्ज भरून घेतला जातो. साक्री मंडळात बाजरी, मका, भुईमूग, कापूस, कांदा या पिकांचा विमा अर्ज भरून घेतला जातो.

साक्रीच्या देना बँकेत केवळ 5 अर्ज
साक्री । तालुक्यातील शेतकर्‍यांना पिक विमा भरण्यासाठी तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँका रविवारी सुरू ठेवण्यात आल्या होत्या. राष्ट्रीयकृत बँकामध्ये शेतकर्‍यांनी काही प्रमाणात पिक विमा अर्ज भरण्यासाठी हजेरी लावली होती. साक्री शहरातील युनियन बँकेत 157 अर्जदारांनी तीन पिकांचे पिक विमा भरणा केला आहे. तर भारतीय स्टेट बँकेत 22 अर्जदारांनी अर्ज भरले आहेत. देना बँकेत 5 अर्जदारांनी अर्ज भरले आहेत. तालुका कृषि कार्यालयात पिक विमा भरण्यासाठी शेतकर्‍यांनी मात्र पाठ फिरवली आहे. तालुका कृषी कार्यालय हे शेतकर्‍यांचे वरदान ठरणारे कार्यालय संपूर्ण दिवस बंद होते. शेतकर्‍यांच्या पिक विमा अर्ज सादर करण्यासाठी कृषी कार्यालयातून काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागते मात्र कार्यालय बंद असल्याने शेतकर्‍यांनी नाराजी व्यक्त केली आहे. साक्री तालुक्याची जबाबदारी असलेल्या तहसिल कार्यालय संपूर्ण दिवस बंद होते.

अधिकारी शेतकर्‍यांच्या प्रतिक्षेत..
धुळे शहरात बँक ऑफ महाराष्ट्र ,जिल्हा बँक,सेन्ट्रल बँक ऑफ इंडीया,पंजाब नॅशनल बँक,युनियन बँक,स्टेट बँक ऑफ इंडीया आदी शाखा सकाळी अकरा वाजेपासुन सुरू होत्या मात्र पिक विमा भरणार्‍या शेतकर्‍यांची गर्दी दिसून आली नाही. काही बँकामध्ये नुसतेच कर्मचारी बसून होते. तर बँकाकडून सायकांळ पर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनूसार धुळे शहर व तालुक्याची आकडेवारी अशी होती. यात महाराष्ट्र बँक 64, स्टेट बँक ऑफ इंडीया 75, जिल्हा बँक 78, युनियन बँक 31, सेन्ट्रल बँक ऑफ इंडीया 42, दैना बँक 35 येथे शेतकर्‍यांनी अर्ज भरला. शेतकर्‍यांच्या प्रतिसादावरून पिक विमाचे अर्ज भरण्याकडे पाठ फिरविली बसलयाचे दिसून येत आहे.

ज्या शेतकर्‍यांनी पिक कर्ज घेतले आहेत. त्यांचा पिक विमा कर्जासोबतचे उतरवला गेला आहे. आणि राहिलेल्या शेतकर्‍यांचा पिक विमा उतरवण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यात 250 बँकाच्या शाखा असल्यामुळे एकूण आकडेवारी यायला वेळ लागेल, तरी गेल्या आठवड्यात घेतलेल्या आढावानूसार एकूण 25 हजाराहून अधिक शेतकर्‍यांचा विमा उतरवला गेला आहे. त्यानूसार धुळे जिल्ह्यातील कोणताही शेतकरी पिक विम्यापासुन वंचीत राहणार नाही.
-प्रशांत सांगळे, जिल्हा कृषी अधिकारी