धुळे: धुळे जिल्ह्यातील शिरूड येथे सेन्ट्रल बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन दरोडखोरांनी चोरून नेल्याची घटना पहाटे अडीचच्या सुमारास घडली. चोरीला गेलेल्या एटीएम मध्ये १४ लाख रुपये रक्कम असल्याचे सांगण्यात येत आहे. धुळे पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून चोरट्यांच्या शोधासाठी पथक रवाना झाले आहे. बँकेच्या एटीएममध्ये पैसे भरणाऱ्या ईपीएस कंपनीचे व्यवस्थापक प्रवीण सुधाकर पाठक यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.
तक्रारीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तेथील सीसीटीव्ही ताब्यात घेतले. सीसीटीव्ही फूटेजमध्ये चोरट्यांची छबी दिसत आहे. हे चोरटे महिंद्रा पिक-अप व्हॅनमधून एटीएम मशीन घेऊन जाताना दिसत आहेत.