धुळे जिल्ह्यात 30 जुनपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

0

धुळे । आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यात 30 जुन 2017 पर्यंत धुळे जिल्ह्यात सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणेकामी प्रतिबंधात्मक आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी लागू केले आहेत. या आदेशात म्हटले आहे, दहशतवाद विरोधी पथक तसेच गुप्तचर यंत्रणेव्दारे प्राप्त माहितीनुसार दहशतवादी संघटना भारतातील तसेच महाराष्ट्रातील गर्दीची ठिकाणे, धार्मिक स्थळे, महत्वाच्या संस्था अशा ठिकाणी राष्ट्र विघातक, समाज विघातक कृत्य करण्याची शक्यता आहे. दहशतवादी संघटना जगात मोठ्या प्रमाणात घातपात करुन तरुण वर्गाला आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत असून त्याकडे मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग आकर्षित होत आहे.