धुळे जिल्ह्यास सीबीएसई दहावी परीक्षेत घवघवीत यश

0

धुळे । दोंडाईचा, शिरपूर, दहिवद येथील सीबीएसई शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. यात शिरपूर येथिल अमरिशभाई पटेल स्कूलमध्ये विवेककुमार रेदासनी व चिन्मय शहा विद्यालयात प्रथम आले आहेत. तर दोंडाईचा येथील श्रीमती मंदाकिनी टोणगांवकर रोटरी इंग्लिश स्कूलमधील दिप्तेश रविंद्र वारूळे विद्यालयात प्रथम आला आहे. तसेच दहिवद येथील स्मिता पाटील पब्लिक स्कूलमधील 9 विद्यार्थ्यांनी 98 टक्के गुण मिळवून धुळे जिल्ह्यांतील गुणवंता यादीत स्थान पटकवले आहे.

अमरिशभाई पटेल स्कूलमध्ये अनमोल रेदासनी, शहा संयुक्तरित्या प्रथम
शिरपूर । शिरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित अमरिशभाई आर. पटेल सी.बी.एस.ई. स्कूलचा दहावीचा निकाल 100 टक्के लागला असून सर्व विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यासह गुण प्राप्त केले आहेत. 36 पैकी तब्बल27 विद्यार्थ्यांना 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत. अनमोल विवेककुमार रेदासनी या विद्यार्थ्यांने 98.4 टक्के गुण व चिन्मय जितेंद्र शहा याने 98.4 टक्के गुण मिळवून विद्यालयात सर्व प्रथम आलेत. अनमोल रेदासनी याने गणित विषयात 100 पैकी 100 गुण प्राप्त केले आहेत. तसेच जशप्रग्नेश शाह याने 97 टक्के, गौरव राजू वाघ याने 96.8, आदर्श शिवजी कोठारी 96.6, स्निग्धा मनोज पाटील 95.6, श्रुती महेंद्र अहिरे 94.8, समीर मनोज तनेजा 94.6, यश रवि बेलदार 94, उत्कर्ष जितेंद्र सेठीया 93.8, श्रुती किशोर जैन 93, कुणाल राजेंद्र मोरे याने 92.8 टक्के गुण प्राप्त केले आहेत. सर्व 12 विद्यार्थ्यांनी सीजीपीए 10.0 पैकी 10.0 ग्रेड मिळविले आहेत. अमरिशभाई पटेल सीबीएसई स्कूलची दहावीची पहिलीच बॅच आहे. या परीक्षेला 36 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी 12 विद्यार्थ्यांनी 93 टक्के पेक्षा जास्त गुण मिळविले असून 15 विद्यार्थ्यांनी 85 ते 92.5 टक्केच्या दरम्यान तर उर्वरीत 9 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माजी शिक्षणमंत्री आमदार अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा जयश्रीबेन अमरिशभाई पटेल, संस्थेचे कार्याध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव प्रभाकरराव चव्हाण, सर्व संचालक, सीईओ डॉ. उमेश शर्मा, प्राचार्य निश्चल नायर यांनी कौतुक केले आहे. सर्व विद्यार्थ्यांना प्राचार्य निश्चल नायर व सर्व शिक्षक, शिक्षिका यांचे मार्गदर्शन लाभले.

मंदाकिनी इंग्लिश स्कुलमध्ये दिप्तेश वारूळे प्रथम
दोंडाईचा । येथील श्रीमती मंदाकिनी टोणगांवकर रोटरी इंग्लिश स्कूल या सीबीएसई 10वीच्या चौथ्या बॅचचा निकाल 100 टक्के लागला आहे. दिप्तेश रविंद्र वारूळे हा 10 पैकी 10 श्रेयांक मिळवून प्रथम तर दुसर्‍या क्रमांक अस्मिता अरूण महाजन हीने पटकविला. तर तिसर्‍या क्रमांकावर आकांक्षा महेंद्र शिंदे व कृष्णा रविंद्र केसवानी आलेत. शाळेतून एकूण 23 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली असून एका विद्यार्थ्यांने 90 टक्केपेक्षा जास्त गुण मिळविले आहेत. यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष हिमांशू शाह, डॉ. मुकुंद सोहोनी, डॉ. रविंद्रनाथ टोणगांवकर, विश्‍वस्त, प्राचार्य एम. पी. पवारांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व रोटरी दोंडाईचा यांनी अभिनंदन केले आहे.

स्मिता पाटील पब्लिक स्कुलचे यश
शिरपूर । तालुक्यातील दहिवद येथील स्मिता पाटील पब्लिक स्कूलचा सीबीएसई दहावींचा निकाल शंभर टक्के लागला आहे. 9 विद्यार्थी 98 टक्के गुण मिळवून धुळे जिल्ह्यांच्या टॉपर यादीत स्थान पटकवले आहे. गेल्या सहा वर्षांपासून सीबीएसई पॅर्टनप्रमाणे शिक्षण या शाळेत दिले जात आहे. यावर्षी 71 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यात भरत वासुदेव पाटीदार, चेतन राजेंद्र चौंधरी, केतन प्रमोद जमादार, राजपाल महेंद्रसिंग राजपूत, ऋतवीक भगवान पाटील, स्वप्नील रूपचंद पाटील, विनय धर्मेंद्र जैन, विपूल सुनिल पाटील, यशराजसिंग लोकेंद्रसिंग चौव्हाण असे 9 विद्यार्थ्यांनी 95 टक्के गुण मिळवून जिल्ह्यांच्या गुणवत्ता यादीत स्थान पटकविले आहे. 6 विद्यार्थ्यांना 9.8 सीपीपीए गे्रड, 3 विद्यार्थी 9.6 गे्रड,25 विद्यार्थ्यांनी 9 तर उर्वरीत 28 विद्यार्थ्यांनी 8.5 सीजीपीए ग्रेड प्राप्त केले आहेत. गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार शिवाजीराव पाटील, संचालक मंडळ, प्राचार्य व प्राध्यापकेतर कर्मचार्‍यांनी कौतुक केले आहे.