धुळे जि.प.त भाजपची तर नंदुरबारात कॉंग्रेसची मुसंडी !

0

मुंबई : पालघर, नागपूर, धुळे, नंदुरबार, अकोला आणि वाशिम या सहा जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे निकाल आज बुधवारी जाहीर होत आहेत. सर्वच जिल्हा परिषदांमध्ये सर्वपक्षीय दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. नागपूर जिल्हा परिषदेत भाजपला मोठा धक्का बसला असून जिल्हा परिषदेवरील भाजपची सत्ता जाण्याच्या मार्गावर आहे. मात्र धुळे जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाने बाजी मारली आहे. तर नंदूरबार जिल्हा परिषदेत कॉंग्रेसची मुसंडी दिसून येत आहे. आता पर्यंत झालेल्या मतमोजणीत १० जागांवर कॉंग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. भाजप पिछाडीवर आहेत.

जवळपास १८ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना तिन्ही पक्ष मिळून ६ उमेदवार आतापर्यंत विजयी झाले आहेत. त्यामुळे भाजपने बहुमताकडे वाटचाल केली आहे.