धुळे । ‘जय भवानी, जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय’ च्या जयघोषनांनी, भगवे झेडे हातात घेवून मराठा व सर्व जाती धर्मातील शिवप्रेमीकडून शांतता मोर्चाचे मनोहर टॉकी जवळील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरवात झाली आहे. या मोर्चात हजारो संख्येने तरूण, महिला व पुरुष सहभागी झाले आहे. भीमा कोरेगाव याठिकाणी झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ धुळ्यात 3 रोजी निघालेल्या मोर्चाच्या दिवशी काही अपवृत्ती व दहशत पसरविणार्या घटकांनी शहरातील दुकाने तसेच एसटी गाड्यांची तोडफोड करून महापुरूषांना अपमानास्पद शब्द वापरल्याच्या तसेच शहरात पसरलेल्या गुंडगिरी, महिलांची छेडखणी, व्यापार्यांना गुंडांचा दम, शासकीय कर्मचार्यांकडून हप्तेखोरी करणार्यांच्या विरोधात कारवाई व्हावी, यासाठी आज जिल्ह्यातून सर्व समाजाचे लोक एकवटले. या मोर्चात जिल्ह्यातील सर्व शिवप्रेमी, व्यापारी, वकील,डॉक्टर, इंजिनीअर, नोकरदार, महिला शिवप्रेमी नागरिक यांच्यासह हजारो संख्येने सहभागी झाले आहेत.