VIDEO: धुळे-नंदुरबार महामार्गावर भीषण अपघात: तीन ठार

0

नंदुरबार/नवापूर: विसरवाडी ते दहिवेल रस्त्यावरील कोंडाईबारी घाटात ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला. यात तीन जण जागीच ठार झाले आहे तर दोन जखमी झाले आहे. ट्रकने धडक दिल्यानंतर कार पुलावरून खाली कोसळली. हा अपघात इतका भीषण होता, की कारचा अक्षरश: चुराडा झाला आहे. मयत व जखमींची ओळख अद्याप पटलेली नाही.

कोंडाईबारी घाटात अरुंद पुलामुळे या ठिकाणी वारंवार अपघात होतात, महामार्ग प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रोष व्यक्त केला जात आहे.
अपघातांची वाढती संख्या पाहूनही प्रशासनाला जाग आली नसल्याने आजचा अपघात झाला. याबद्दल नागरिकांमधून रोष व्यक्त होत आहे.