धुळे पंचायत समितीचा लाचखोर तांत्रिक अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

0

आरोपीला न्यायालयाने सुनावली न्यायालयीन कोठडी ; पंचायत समिती वर्तुळात खळबळ

धुळे- पंचायत समितीतील तांत्रिक अधिकारी शशीकांत जयसिंग गिरासे (30 304, वाडीभोकर रोड, धुळे) यास फळबाग योजनेची रक्कम ऑनलाईन जमा करण्यासाठी करण्यासाठी एक हजार 700 रुपयांची लाच घेताना गुरुवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पंचायत समिती कार्यालयातच धुळे एसीबीने पकडल्याने खळबळ उडाली होती. आरोपीच्या अटकेनंतर घराची झडती घेण्यात आली मात्र त्यात काहीही आढळले नाही तर शुक्रवारी आरोपीस धुळे न्यायालयात हजर केल्यानंतर त्यास न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

आधी मागितली तीन हजारांची लाच
धुळे जिल्ह्यातील धमानेच्या तक्रारदाराच्या आईच्या नावाने असलेल्या फळबाग योजनेंतर्गत कुशल बिलाची रक्कम 14 हजार 500 याव गटविकास अधिकार्‍यांची स्वाक्षरी घेवून ही रक्कम ऑनलाईन जमा करण्यासाठी आरोपी शशीकांत गिरासे यांनी तीन हजारांची 22 रोजी लाच मागितली मात्र एक हजार 700 रुपये लाच देण्याचे ठरल्यानंतर तक्रारदाराने धुळे एसीबीकडे तक्रार केली. 23 रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास धुळे पंचायत समिती कार्यालयातच पंचांसमक्ष आरोपीने लाच स्वीकारल्याने त्याच्या मुसक्या आवळलया आल्या. आरोपीच्या घर झडतीत काहीही आढळले नसल्याचे सूत्रांनी सांगितले. ही कारवाई धुळे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महेश भोरटेकर व सहकार्‍यांनी केली.