धुळे पोलिस प्रशिक्षण केंद्रात कर्मचार्यांना विषबाधा : त्री सदस्य समिती करणार चौकशी
22 पोलिसांना रुग्णालयातून मिळाली सुटी : सात जणांवर अद्यापही उपचार सुरू
धुळे : धुळे शहरातील शिवतीर्थ चौकापासून जवळ असलेल्या पोलिस प्रशिक्षण केंद्रातील 70 जणांना शुक्रवारी विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली होती. उलटी, चक्कर व अशक्तपणा जाणवताच त्यांना हिरे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातील 41 जणांना रात्री सोडण्यात आले होते मात्र 29 प्रशिक्षणार्थी पोलिसांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. त्यापैकी 22 जणांना शनिवारी डिस्चार्ज मिळाला. अद्यापही सात पोलिसांवर जणांवर उपचार सुरू आहे.
चौकशीसाठी त्री सदस्यीय समिती
ही घटना नेमकी कशामुळे घडली, याचा शोध घेण्यासाठी पोलिस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य किशोर काळे यांनी त्रिसदस्यीय चौकशी समिती गठीत केली आहे. उपप्राचार्य प्रमोद पवार, डॉ. भामरे व अधिकारी पवार यांचा समितीत समावेश आहे. दुसरीकडे अन्न व औषध प्रशासनाने अन्नाचे नमुने घेतले आहे. ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. त्याचा अहवाल सादर समितीला सादर होईल, अशी माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.