A police inspector committed suicide in the police training center in Dhule by writing a suicide note धुळे : शहरातील पोलिस प्रशिक्षण केंद्रातील पोलिस निरीक्षक प्रवीण विश्वनाथ कदम यांनी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली. आत्महत्येपूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहिली असून त्यात त्यांनी आत्महत्येस कुणालाही जवाबदार धरू नये, असा उल्लेखही केला आहे.
शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
निरीक्षक प्रवीण कदम यांच्याकडे पोलिस प्रशिक्षण केंद्रातील खानावळची जवाबदारी होती शिवाय प्रशिक्षण केंद्रातील सह्यादी इमारतीतील प्लॅट क्रमांक दोनमध्ये ते वास्तव्यास होते. धुळे पोलिस प्रशिक्षण केंद्रात ते 2019 पासून सेवेत होते व अलिकडेच त्यांच्या बदलीची शक्यताही वर्तवली जात होती. सकाळी कदम यांनी आपल्या नातेवाईकांना गुड मॉर्निंगचा संदेश पाठवला मात्र दिवसभर ते खोलीतून बाहेर पडलेच नाही मात्र सायंकाळच्या सुमारास त्यांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. शहर पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक नितीन देशमुख व सहकार्यांनी धाव घेत पाहणी केली. या प्रकरणी शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सुसाईड नोट पोलिसांकडून जप्त
आत्महत्येपूर्वी पोलिस निरीक्षक प्रवीण कदम यांनी सुसाईड नोट लिहिली असून त्यात आत्महत्येस कुणालाही जवाबदार धरू नये, असा उल्लेख केला आहे तसेच एका अपघाताच्या गुन्ह्याचा योग्य तपास झाला नसल्याचीही खंत व्यक्त केल्याचे समजते. निरीक्षक कदम यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परीवार आहे.