अमळनेर/ धुळे:- धुळे महामार्ग भूसंपादनाच्या वाढीव मोबदल्याप्रकरणी अमळनेर पोलिसांनी मंगळवारी कोठडीत असलेल्या धुळे शिवसेना महानगरप्रमुख सतीश महाले व माजी नगरसेवक विनायक शिंदे यांच्यात तिसरा अटक करण्यात आलेल्या भरत जाधव यांना जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात हजर केले असता न्या राजीव पी पांडे यांनी ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
भरत जाधव यास ताब्यात घेतल्या असून त्याच्याकडून २२ लाख रुपये जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी यापूर्वीच धुळे शिवसेना महानगरप्रमुख सतीश महाले आणि माजी नगरसेवक विनायक शिंदे यांना अटक करण्यात आली आहे. तिसरा संशयित भरत जाधव असून त्याला सोमवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे. भरत या दोघांचा हस्तक असल्याने पुन्हा या तिघांची चौकशी करण्यासाठी ही कोठडी सुनावण्यात आली आहे.
भूसंपादन वाढिव मोबदल्या प्रकरणी महाले आणि शिंदे यांनी एका ऊस तोड आदिवासी कामगाराची फसवणूक करुन दोन कोटी रुपये हडपले आहेत. या प्रकरणात पुन्हा भरत जाधवसह दोघांना पुन्हा सात दिवसांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. अमळनेरचे पोलिस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी रविवारी धुळ्यात जाऊन भरत जाधव यास ताब्यात घेतले होते. त्याने मोबाइल व्यवहारव्दारे पैसे वळते केले होते. त्यात त्याने काढलेले २२ लाख रुपये पोलिसांच्या स्वाधीन केले आहेत पुन्हा उर्वरित रकमेची वसुली व चौकशी करण्यासाठी पोलिसांनी कोठडी मागितली आहे.