मुलाखतीनंतर अंतिम यादी घोषीत; पदभरतीनंतर प्रशासकीय कामांना मिळणार गती
धुळे । महापालिकातर्फे राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत (एनयूएचएम) वैद्यकीय अधिकारी व इतर पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडली. त्यात वैद्यकीय अधिकारी पदाच्या 3 जागांसाठी 5 उमेदवारांनी अर्ज केले होते. परंतु, या पदासाठी एम.बी.बी.एस. व मेडिकल कौन्सीलकडून नोंदणी ही पात्रता असल्यामुळे तीन उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरविण्यात आले. मनपातर्फे स्टाफ नर्स, एएनएम. डाटा एन्टी ऑपरेटर कम अकौउन्टंट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, अंटेडन्ट आदी रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहे.
महापालिका आवारात यादी प्रसिध्द
डाटा एन्ट्री ऑपरेटर कम अकौउंटन्ट पदाच्या दोन जागांसाठी 31 अर्ज आले होते. परंतु, प्राप्त अर्जापैकी केवळ 10 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरविण्यात आले. स्टाफ नर्स 2 जागेसाठी 10 अर्ज आले होते त्रापैकी 7 अर्ज पात्र, ए.एन.एम पदाच्या 1 जागेसाठी 28 उमेदवारांनी केलेल्या अर्जापैकी 5 , प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाच्या 2 जागांसाठी 8 पैकी 7, तर अटेडन्टच्या 1 पदासाठी 21 अर्जापैकी 5 उमेदवारांना मुलाखती पात्र ठरविण्यात आले आहे. मुलाखीनंतर पात्र ठरलेल्या उमेदवारांची अंतिम यादी बुधवारी सकाळी महापालिकेत प्रसिद्ध करण्यात आली. मुलाखीत अपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी मंगळवारी सायंकाळी प्रसिद्ध करण्यात आली होती. मनपाच्या विविध पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची यादी मंगळवारी प्रसिध्द करण्रात आली. पदे भरल्यानंतर प्रशासकीय कामांना गती मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
103 उमेदवारांचे अर्ज
यासंदर्भात महापालिका प्रशासनातर्फे पात्र उमेदवारांसाठी असलेली शैक्षणिक अर्हता यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यानुसार 103 उमेदवारांनी विविध पदांसाठी अर्ज केला होता. अर्ज सादर करणार्रा सर्व उमेदवारांच्या मुलाखती मनपा सभागृहात उपायुक्त रवींद्र जाधव, आरोग्य अधिकारी डॉ.महेश मोरे, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक संजय शिंदे यांनी घेतल्या. तर डाटा एन्ट्री ऑपरेटर कम अकौउन्टंट या पदासाठीच्या मुलाखती मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांनी स्वतंत्रपणे घेतली.