उद्या उमेदवारी जाहीर करण्याची शक्यता
धुळे- महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने 19 प्रभागातील 73 जागांसाठी 195 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहे. दरम्यान दिवाळीनंतर योग्य उमेदवारांची निवड व जागा वाटपाचा निर्णय पक्षांची घेतल्यामुळे आता इच्दुक उमेदवारांनी उमेदवारीची प्रतिक्षा लागली आहे. उद्या मंगळवारी उमेदवारी जाहीर करण्याची शक्यता आहे.
शहरातील कमलाबाई कन्या विद्यालयासमोर राष्ट्रवादी संपर्क कार्यालयात माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या अध्यक्षतेखाली मुलाखती घेण्यात आल्या होत्या.पहिल्या दिवशी 73 तर शेवटच्या दिवशी 122 उमेदवार अशा 195 उमेदवरांनी 73 जागांसाठी मुलाखती दिल्या होत्या. दरम्यान एका प्रभागासाठी पक्षाकडे बहुसंख्य उमेदवार असल्याने राष्ट्रवादीला योग्य उमेदवारांची निवड करावी लागणार आहे.
राष्ट्रवादी ही निवडणूक काँग्रेससह समविचारी पक्षांनासोबत घेऊन लढणार असल्याने त्या-त्या पक्षांना सन्मानपूर्वक जागावाटपाचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पक्षााच्या वर्चस्व सक्षम उमेदवाराच्या आधारावर जागा वाटप केली जाणार आहे. मुलाखतीनंतर राष्ट्रवादीचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, काँग्रेसचे माजीमंत्री रोहिदास पाटील, समाजवादी पार्टीचे अबु आझमी यांची जागावाटपावर चर्चा झाली आहे. काँग्रेस, समाजवादीच्या मुलाखतीनंतर राष्ट्रवादी निर्णय घेण्याची शक्यता आहे.
माजी उपमहापौर, आजी-माजी नगरसेवकांना जागा वाटपाची प्रतिक्षा आहे. राष्ट्रवादी पक्षातर्फे माजी उपमहापौर उमेद अन्सारी, नगरसेवक संदिप पाटोळे, गिता नवले, राजश्री शिंदे, कुणाल पवार, ईश्वर पवार, माजी नगरसेवक तुषार पाटील, जितेंद्र शिरसाठ, कैलास चौधरी, रमेश बोरसे, अरुणा मोरे, कमलेश देवरे, अरुण पवार, अनिली वाडीले, शिवाजी पवार, विलास शिंदे, उमेश महाले आदी नगरसेवकांची मुलाखत झाली आहे.