धुळे मनपा निवडणूक: आरओ कार्यालयांवर सीसीटीव्हींची नजर

0

धुळे- महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आजपासून कार्यान्वित झालेल्या सर्व निवडणूक निर्णय अधिकारी आरओ कार्यालयांमध्ये एकूण 36 सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. त्यामुळे निवडणूक होणार्‍या प्रत्येक हालचालीवर सीसीटिव्हीचा वॉच असणार आहे.

महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाकडून सहा निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकार्‍यांसाठी स्वतंत्र दालन कार्यान्वित करण्यात आले असून संबंधित अधिकार्‍यांवर प्रभागनिहाय जबाबदारी सोपविण्यात आली आहे. प्रत्येक निवडणूक अधिकार्‍यांच्या दालना बाहेर सहा कॅमेरे बसविण्यात आले आहे. त्याप्रमाणे इर्न्व्हटर, फर्निचरची कामेही जवळपास पूर्णत्वास आली आहे. महापालिका निवडणूकीची सर्व प्रक्रिया निवडणूक आधिकार्‍यांचा कार्यालयातून पार पडणार आहे. महापालिका निवडणूकीसाठी नामनिर्देशन पत्र भरतांना भराव्या लागणार्‍या शपथपत्राचा नमुना यंदा बदलला आहे. उमेदवारांना नामनिर्देशन पत्र भरतांना अडचणी येऊ नयेत यासाठी मनपाच्या आठ कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.