धुळे मनपा निवडणूक: राजकीय पक्षाच्या स्टार प्रचारकांची यादी सादर होईना

0

धुळे- महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाने स्टार प्रचारकांची यादी महापालिकेला सादर करावी अशा सूचना आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सुधारक देशमुख यांनी दिल्या होत्या. मात्र एकही पक्षाकडून यादी सादर केलेली नाही.

महापालिका निवडणूकीत प्रचारासाठी वेगवेगळ्या स्टार प्रचारकांचा वापर विविध राजकीय पक्षांकडून केला जातो. मोठ्या राजकीय पक्षाचे राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवरील नेते शहरात प्रचारासाठी येत असतात. त्यामुळे प्रत्येक पक्षाने स्टार प्रचारकांची यादी महापालिकेला 7 नोव्हेंबर पर्यंत सादर करावी, अशा सूचना आयुक्त सुधाकर देशमुख यांनी 3 नोव्हेंबरला झालेल्या राजकीय पक्ष पदाधिकार्‍यांच्या बैठकीत दिल्या होत्या. आजपासून निवडणूक निर्णय अधिकार्‍यांची कार्यालये कार्यान्वित झाली आहे. त्यानंतर निवडणूक प्रक्रियेला गती येणार आहे.