राष्ट्रवादी काँग्रेसचे कमलेश देवरे यांचा 1 मतांनी पराभव
धुळे । महापालिकेच्या स्थायी समिती सभापती निवडणुकीत भाजपच्या बालिबेन मंडोरे यांच्या नाट्यमय रिता विजय झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे कमलेश देवरे यांचा एका मताने पराभव केला. बालिबेन मंडोरे यांना 8 मते मिळाली तर कमलेश देवरे यांना 7 मते मिळाली. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी कडून फटक्यांची आतषबाजी करत जलोर्ष करण्यात आला. दरम्यान, निवड प्रक्रिया सुरु होण्यापुर्वी समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या गोंधळामुळे पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. पत्रकारांना वृत्तसंकलनासाठी सभागृहात मज्जाव करण्यात आला होता. महापालिकेत स्थायी समिती आणि महिला व बालकल्याण समिती सभापती निवड प्रक्रिया सुरु होण्यापुर्वी नगरसेवकांना घेवून येणार्या वाहनाला अडविण्यात आले.
पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज
परिस्थिती हाताबाहेर जाण्यापुर्वीच पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करण्याची वेळ आली. या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदासाठी निवडणूक प्रक्रियेला शुक्रवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास सुरुवात होण्यापुर्वी हितचिंतकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली. सभापतीपदाकडे सर्वांचे लक्ष असल्याने आणि नगरसेवकांचा पळवा-पळवी होऊ शकते असा अंदाज असल्याने पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता. प्रक्रिया सुरु होण्यापुर्वी समाजवादी पार्टीच्या नगरसेविका शेख फातमा शेख गुलाब हे वाहनाने दाखल झाल्या़ त्यावेळी समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी गर्दी करण्यास सुरुवात केली. यावेळी अन्य कार्यकर्त्यांची गर्दी होत असल्याने परिस्थिती हाताबाहेर जावू नये यासाठी पोलिसांनी सुरुवातीला जमा होत असलेली गर्दी हलविली. तरीही काहीही फरक पडत नसल्याने शेवटी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला़ सौम्य लाठीचार्ज केल्यामुळे धावपळ उडाली होती. अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, उपविभागीय पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, धुळे शहर पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा तैनात होता.