धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांकडून गोळीबाराचा सराव

0

693 व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाईसह 75 उपद्रवींना बंदीसाठी प्रस्ताव प्रांतांकडे

धुळे- धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक विश्‍वास पांढरे यांच्या आदेशानुसार पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांकडून गोळीबाराचा सराव केला जात आहे. त्यात 95 अधिकार्‍यांसह एक हजार 525 पोलिस कर्मचारी त्यात सहभागी झाले आहेत. धुळे महापालिका निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासनाचे नियोजन आहे. गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या 693 व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासह 75 उपद्रवींना निवडणूक काळात शहरात बंदी करण्यासंदर्भातील प्रस्ताव प्रांताधिकार्‍यांकडे पाठवण्यात आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. निवडणूक काळात कुणीही कायदा हातात घेतल्यास तसेच मतमोजणीवेळी उपद्रव करणार्‍यांविरूद्ध कठोर कारवाई केली जाईल, असे जिल्हा पोलिस अधीक्षक विश्‍वास पांढरे म्हणाले.