धुळे महापालिका निवडणूक ; राज्य निवडणूक आयोगाचे सचिव 16 रोजी धुळ्यात

0

धुळे- महापालिका सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली असून आजपासून निवडणूकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. त्यानुसार निवडणूक प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने हे 16 नोव्हेंबरला धुळ्यात येत आहेत. महापालिका निवडणूकीबाबत सुरू असलेल्या प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी आयोगाचे सचिव शेखर चन्ने यांच्यासह महाराष्ट्र सायबर सेलचे पोलिस अधीक्षक बालसिंग राजपूत, जनसंपर्क अधिकारी जगदीश मोरे, आयोगाचे सहायक कक्षाधिकारी प्रदीप परब हे 16 नोव्हेंबरला सकाळी 10 वाजता बैठक घेणार आहेत. त्यानंतर 11.30 वाजता प्रसार माध्यमांसाठी कार्यशाळा होणार आहे.