आता माघारीकडे लागले लक्ष ; राजकीय पक्षांची भूमिका ठरणार महत्त्वाची
धुळे- धुळे महापालिका निवडणुकीत छाननी अंती तब्बल 263 अर्ज अवैध ठरले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी एकुण 737 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. छाननी अंती तब्बल 263 अर्ज अवैध झाल्याने निवडणूकीत 474 अर्ज वैध ठरले आहेत. सोमवारी माघारीची दिवशी निवडणूकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. राजकीय पक्षांचे गणित ऐनवेळी ठरल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिनी तब्बल 660 अर्ज दाखल झाले होते. धुळे महापालिकेची निवडणूकीची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सोमवारी माघारीची अंतिम मुदत आहे. त्यामुळे वैध 474 उमेदवारांपैकी किती उमेदवार उमेदवारी अर्ज मागारी घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. सोमवारी तीन वाजेपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहे. त्यानंतर उमेवारांची अंतिम यादी समोर येणार आहे. सोमवारी उमेदवारांची अंतिम यादी निश्चित होताच त्यांना निवडणूक चिन्हांचे वितरण करण्यात येणार आहेत. महापालिका व निवडणूक आयोगातर्फे प्रथता उमेदवारी अर्ज ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात आले होते मात्र ऑनलाईन प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळाला नाही. अखेर शेवटच्या दिवशी निवडणूक आयोगाने आदेश देवून उमेदवारी अर्ज ऑफलाईन पध्दतीने भरण्यास परवानगी दिली होती. शेवटच्या दिवशी तब्बल 660 अर्ज दाखल झाले होते. अतिशय घाईघाईने उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यामुळे चांगलाच गोंधळ उडाला होता. परिणामी छाननी अंती तब्बल 263 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत. अनेक उमेदवारांनी उमेदवारी अर्जावर स्वाक्षरीच केली नाही. अनेकांनी प्रभागातील आरक्षण बाजूला ठेवून जातीचा दाखला जोडलेला नाही. उमेदवारांना अन्य आवश्यक कागदपत्रे जमा करण्यास संधी मिळाली नाही. राजकीय पक्षांनी वेळेत एबी अर्ज उमेदवारांना दिले नाहीत. त्यामुळे चांगलाच गोंधळ उडाला होता. अगदी शेवटच्या क्षणी ही प्रक्रिया सुरू झाल्याने अनेक उमेदवारांना उमेदवारी अर्ज सदोष भरता आला नाही. सोमवारी माघारीचा अंतिम दिनी 474 उमेदवारांपैकी किती उमेदवार माघारी घेतात. त्यानंतर निवडणूकीच्या मैदानात किती उमेदवार राहतात हे निश्चित होणार आहे.