धुळे : ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून धुळ्याीहू महापौर पदाचा प्रश्न थेट सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाच्या आदेशामुळे प्रदीप कर्पेना अवघ्या सात महिन्यातच महापौर पदाचा राजीनामा द्यावा लागला मा महापौर पदासाठी नव्याने प्रक्रिया राबविण्याच्या सूचना करण्यात आल्यानंतर महापौर आरक्षण हे खुल्या प्रवर्गासाठी जाहिर झाल्यानंतर भाजपाने पुन्हा प्रदीप कर्पे यांचे नाव सूचवल्यानंतर त्यांनी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी अर्ज सादर केला आहे.
भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष
महापालिकेत भाजपाची सत्ता असून केवळ कर्पे यांचा अर्ज दाखल झाल्याने कर्पे यांचीच महापौरपदी निवड होणार असल्याचे निश्चित आहे.केवळ औपचारीक घोषणा केवळ आता बाकी. कर्पे बिनविरोध महापौर झाल्याने फटाक्यांची आतिषबाजी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केली तसेच पेढे भरवून तोंड गोड करण्यात आले.