धुळे येथील वाडिले कुटुंबावर काळाने घातली झडप

0

चाळीसगाव । धुळे येथील नवनाथ नगरातील वडिलें कुटुंबावर काळाने झडप घातली असून मुलीच्या लग्नापूर्वीचे त्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. मुलीच्या लग्नाच्या पत्रिका चाळीसगावकडे वाटपासाठी मोटारसायकल वर येत असलेल्या पिता पुत्र व भाचा यांच्या मोटारसायकल ला चाळीसगाव धुळे रोड वरील चिंचगव्हाण फाटा ते खडकी सिम फाटा दरम्यान डंपर ने समोरून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात पिता पुत्र जागीच ठार झाले तर 16 वर्षीय भाचा गंभीर जखमी झाला असून त्याचे वर धुळे येथील सेवा खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशन ला डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी नामदेव वामन वडिलें (55, रा. नवनाथ नगर धुळे) यांच्या मुलीचे लग्न आठवडा भरात असतांना त्या लग्नाच्या लग्न पत्रिका वाटप करण्यासाठी ते व त्यांचा मुलगा राकेश नामदेव वडिलें (20) व भाचा यश संजय मोरे (16, रा सावदा) हे तिघे जण त्याची हिरो डिलक्स मोटारसायकल क्र (एमएच 18 एएम 1490) वरून चाळीसगाव कडे येत असतांना चाळीसगाव कडून भरधाव वेगाने जाणार्‍या डंपर क्र एम एच 45 – 1947 ने त्यांच्या मोटारसायकल ला चाळीसगाव धुळे रोड वरील चिंचगव्हाण फाटा ते खडकी सिम फाट्या दरम्यान समोरून धडक दिल्याने झालेल्या अपघातात नामदेव वामन वडिलें (55), राकेश नामदेव वडिले (20) यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचा भाचा यश संजय मोरे (16, रा.सावदा ) हा गंभीर जखमी झाला असून त्याचेवर धुळे येथील सेवा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघात होताच डंपर चालकाने तेथून पलायन केले आहे. या प्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशन ला विजय पुंडलिक वडिलें (37) रा शास्त्री नगर चाळीसगाव यांनी दिलेल्या फिर्यादी वरून वरील डंपर वरील अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप शिरसाठ करीत आहे.