धुळे । येथील जिल्हा रूग्णालयात डॉक्टरांना झालेल्या मारहाणीसह प्राणघातक हल्ल्याची सखोल चौकशी करावी यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन जिल्हाधिकारी आवारात निर्देशनेही केली. धुळे येथील जिल्हा रूग्णालयात डॉ.रोहण म्हामुनकर यांच्यावर जमावाने प्राणघातक हल्ला केला. या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोळ्याला जबर दुखापत झाली आहे. या घटनेचा अभाविप निषेध करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
अशा आहेत मागण्या
रूग्णालयात काम करणारे डॉक्टर हे देव नसून केवळ प्रयत्न करणारा माणूस असतो. त्याच्या उपचाराने रूग्णाचे प्राण वाचत असतात. डॉक्टरांवर हल्ला होणे हे चुकीचे आहे. घटनेतील एका संशयीताने कारागृहात आत्महत्या केल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबधीतांवर कठोर कारवाई करावी तसेच डॉक्टरांना संरक्षण द्यावे, अशी मागणी केली आहे. प्रदेश सहमंत्री धनश्री चांदोडे,शहरमंत्री महेश निकम, राहुल साठे यांच्यासह मयूर गुरव,पिनू मोहीते,अक्षय पदमोर,संदीप चौधरी आदिंनी उपजिल्हाधिकारी पंकज चौबळ यांना निवेदन देण्यात आले.