धुळे येथे दोन लाखांसाठी विवाहितेचा छळ

0

धुळे । वीटभट्टी सुरू करण्यासाठी माहेरून दोन लाख रुपये आणले नाहीत तसेच भट्टीवर कामाला येत नाही, या कारणावरून सोनल भाईसाहेब उर्फ तुषार प्रभाकर कुंभार (20, रा. एसआरपीएफ कॉलनी, नकाणोरोड, धुळे, ह.मु.महिंदळे, ता.धुळे) या विवाहितेचा सासरी लग्नानंतर एक महिन्यापासून ते 6 मे 2017 या काळात शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. तिला शिवीगाळ करुन उपाशी ठेवण्यात आले तसेच हाताबुक्क्यांनी मारहाण केली.

याप्रकरणी तिने पश्‍चिम देवपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन पती भाऊसाहेब उर्फ तुषार प्रभाकर कुंभार, सासू अनुसया प्रभाकर कुंभार, सासरे प्रभाकर मंगा कुंभार रा.सर्व एसआरपीएफ कॉलनी, नदीकिनारी, विटाभट्टीजवळ नकाणोरोड, धुळे या तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.