धुळे रेल्वे लाईनवर धावले इलेक्ट्रिक इंजिन 

2

उद्या केंद्राच्या सीआरएस अधिकारी करणार पाहणी

चाळीसगाव- गेल्या अनेक वर्षांपासून चाळीसगांव ते धुळे रेल्वे मार्गावर डिझेल इंजिन धावते आहे. मात्र गेल्या दीड दोन महिन्यापासून या मार्गाचे विद्युतीकरण सुरू होते.या कामासाठी धुळे रेल्वे मार्गावर धावणारी गाडीची एक फेरी कमी करण्यात आली होती. तसेच कर्मचारी अधिकारी हे रात्रंदिवस मेहनत घेऊन या मार्गावरील विद्युतीकरण कामाला अंतिम रूप देत होते. आज अखेर सकाळी नऊ ते दहा वाजता या मार्गावर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रेल्वे इंजिन धावले. इंजिन सुखरूप पोहचल्याने या मार्गावरील विद्युतीकरण यशस्वी झाल्याचा आनंद रेल्वे लाईनवर काम करणाऱ्या अधिकाऱ्या सह कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. या इंजिनच्या आवजाने धुळे रेल्वे लाईन परिसरातील नागरिकांनी अक्षरशः टाळ्या वाजवून स्वागत केल्याचे चित्र होते. तर हौशी प्रवाश्यांनी इंजिन धावतानाचे व्हिडिओ मित्रांना पाठवून विद्युतीकरण कामाबाबत आनंद व्यक्त केला आहे. उद्या या सर्व विद्युतीकरण कामांचे व धावत्या रेल्वेचे केंद्राचेे  “सीआरएस” अर्थात दिल्ली येेेेथून  कमिशनर ऑफ रेल्वे सेफ्टी ऑफिसर अंतिम पाहणी करण्यासाठी येेत आहेत.व या कामाला अंतिम रूप दिले जाईल. चाळीसगाव ते धुळेेे रेल्वेने नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांना रेल्वे इंजिन प्रवासाची उत्सुकता लागली आहे.