पदभार स्वीकारला ; भ्रष्टाचाराबाबत तक्रार करण्याचे आवाहन
धुळे- जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन निरीक्षक सुनील कुराडे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागात बदली झाल्यानंतर त्यांची धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस उपअधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश निघाल्यानंतर बुधवारी त्यांनी धुळे कार्यालयात पदभार स्वीकारला. तत्कालीन उपअधीक्षक शत्रुघ्न माळी यांची नागपूर लोहमार्ग विभागात बदली झाल्यानंतर कुराडेे यांची रीक्त पदावर वर्णी लागली आहे.
तक्रारदारांना पुढे येण्याचे आवाहन
कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तत्काळ धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा वा टोल फ्री क्रमांक 1064 वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस उपअधीक्षक सुनील कुराडे यांनी केले आहे.