धुळे । जिल्ह्यातील धुळे शहर व शिरपूर शहरात अचानक आज आयकर विभागाची धाड पडल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, आयकर विभागाने अमरीशभाई पटेल यांच्या डीसान रेडिमेड कपड्याच्या कंपनीतील शेअर भागीदारांच्या घरावर तसेच धुळे शहराचे राष्ट्रवादीचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, शिरपूर शहरात अमरीशभाई पटेल यांच्या घरासह प्रभाकर चव्हाण, राजगोपाल भंडारी, अशोक कलाल, अॅड.सी.बी.अग्रवाल, वरूण अग्रवाल आदी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या घरी छापेमारी सुरू आहे. दरम्यान, जनशक्तीने आयकर विभागांच्या अधिकार्यांशी संवाद साधला असता नाशिक कार्यालयाकडून सविस्तर माहिती घ्यावी, असे सांगण्यात आले.