धुळे (योगेश जाधव) । देशभरात स्वच्छ भारत अभियान राबवल्या जात असताना शहरातील स्वच्छतेच्या बाबतीत बारा वाजले आहेत .ठिकठिकाणी कचराचा ढिंग साचलेला आहे.त्यावर मोकाट जनावरांचा वावर वाढल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे.यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. घंटागाडी देखील दोन-तीन दिवस येत नसल्याच्या येथील नागरिकांच्या तक्रारी आहेत. प्रभागातील कचरा नियमितपणे उचलण्याकडे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत आहे.शहरतील मुख्य रस्तावरील कचराकुंडी भोवताली कचर्याचा ढीग साचलेला दिसून येत आहे. हा कचरा अनेक दिवस उचलला जात नसल्याचे परिसरातील नागरिकांनी अनेक वेळा महापालिकेत तक्रारी व निवेदन देऊन देखीलही कचरागाडी दोन-दोन, तीन-तीन दिवस येत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
कचरा उचलण्यासाठी लाखो रुपये खर्च
रस्ते सफाई सुध्दा व्यवस्थित केली जात नाही. मुख्य रस्त्यावर अस्वच्छता, कचरा पडलेला दिसून येतो. प्रभागातील बहुतांश: सफाई कामगार अनुपस्थित राहत असल्याचा आरोप स्थानिक नगरसेवक वेळोवेळी करीत असतात.कचरा उचलण्यासाठी दरवर्षी महापालिका लाखो रुपये खर्च करित असते.पावसाळ्यात स्वच्छता बाबतीत काळजी घेणे आवश्यक असताना. आरोग्यविभागाच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
कचराकुंड्या ओसडून वाहतात
कचराकुंड्या ओसडून वाहतात ठिकठिकाणी कचर्याचे साम्राज्य पसरलेले असून,कचरा कुंडे ओसडून वाहत आहे.यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे .शहरात डेंग्यू, मलेरियासारख्या वा तत्सम आजारांचा प्रादुर्भाव महापालिका क्षेत्रात वाढत असताना महापालिकेचा आरोग्य विभाग नागरिकांच्या आरोग्या बाबतीत उदासीन असल्याचे दिसून येते आहे. त्याकडे दुर्लक्ष करून महापालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी हे नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असल्याने नागरिकान कडून संताप व्यक्त केला जात आहे.
आमच्या परिसरात नेहमी अस्वच्छता असते.सर्वत्र कचराचा ढिंग साचलेला असून घंटागाडी नेहमी येत नाही.यासंदर्भात आम्ही अनेकदा तक्रारी करूनही महापालिका प्रशासनाने दखल घेत नाही.
विनोद मोरे
आमच्या कॉलनी परीसरात ठिकठिकाणी कचर्याचे ढीग साचलेले आहे.त्यावर मोकाट जनावरांचा वावर वाढल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. यामुळे आमचे आरोग्य धोक्यात आले आहे.
जयराम सोनार