योगेश जाधव धुळे । ध ळे शहरातील आग्रा रोडसह मुख्य रस्त्याचा रहदारीचा गुंता दिवसेंदिवस जटील होत चालला आहे. वाहनधारकांच्या बेशिस्तपणामुळे रस्त्याची समस्या अधिक गंभीर होत आहे. या समस्येवर वाहतूक पोलीस तात्पुरती मलम पट्टी करत असल्याने मात्र त्याचा फारसा काही फायदा होतांना दिसत नाही. धुळेकरांना या रस्त्याच्या रहदारीच्या समस्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची अपेक्षा प्रशासनाकडे करण्यात येत आहे. शहरातील रहदारिचा गुंता सुटेन का? असा प्रश्न नागरिंकाकडून उपस्थित होत आहे. शहरातील वाढत्या लोकसंख्ये बरोबरच वाहनांची संख्यादेखील अधिक झपाट्याने वाढत आहे. आणि रस्ता आहे तेवढाच आहे. त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवर नेहमीच वाहतूकीची कोंडी होते. आग्रा रोडावरील बाजार पेठेत शहरासह ग्रामिण भागातील लोक मोठ्या प्रमाणात बाजार करण्यासाठी दाखल होत असतात. त्यात हॉकर्स,दुचाकी,चारचाकी वाहन धारकांचा शिरकाव होत असल्यामुळे एकदंरीतच वाहतूकीची कोंडी होते. आणि त्यामुळे पादचार्यांना पायी चालतांना मोठी कसरत करावी लागत आहे.
वाहतूक शाखेकडून कारवाईची मागणी
लग्नसराई सुरू असल्यामुळे शहरातील तसेच ग्रामिण भागातील लोक बस्त्यासाठी शहरात जमत असतात. त्यामुळे संतोषी माता चौक,बसस्थानक,दंतमंदीर चौक,फाशी पुल चौक, जैन चौक,सुभाष चौक,पारोळा चौफूली आदि ठिकाणी बस्त्यासाठी आलेल्या लोकांचे वाहनांच्या पार्किंगमुळे वाहतूकीची वर्दळ होते. शहरातील मुख्या चौकांमध्ये शहर वाहतूक शाखेचे विविध ठिकाणी पोलीस कर्मचारी नियुक्त केले आहेत. पंरतू ह्या बेशिस्त वाहतूकीकडे दुर्लष केल्याचे दिसून येत आहे. वाहतूक शाखेकडून योग्य ती कारवाई झाल्यास रहदारिचा हा प्रश्न पुर्णपणे सुटला नाही तरी काही प्रमाणात नागरिकांना दिलासा तरी मिळेल अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. शिवाय आग्रा रोडवर फेरीवाल्यांच्या मनमानीस लगाम लावण्यासाठी महापालिकेनेदेखील खंबीर पाऊल उचलने गरजेचे आहे. काहि फेरिवाले व मुजोर रिक्षा चालक रस्त्यावर प्रवासी बसविण्यासाठी रस्त्यातच रिक्षा थांबवितात. त्यामुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होतो. अशा रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई करणे गरजेचे आहे.
पार्किंग व्यवस्थेचा प्रश्न बिकट
शहरातील वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता वाहणे पार्किंग करण्यासाठी बाजारपेठेत पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने वाहन चालक रस्त्याच्या कडेला तर काही रस्त्याच्या मधोमध गाड्या लाऊन निवांत बाजारात फीरतात. आडवे, उभे लावलेल्या वाहनांमुळे बाजारपेठेत एकच गर्दी होते. त्यासाठी महापालिकेने वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्याची अवश्यकता आहे. तसेच बाजारपेठेतील ध्वजचौकाजवळ नेहमीच मोकाट जनावरांची झुंड रस्त्याच्या मधोमध बसलेली दिसते. त्या जनावरांना कोणी बाहेर काढत नाही. त्यांचा काहीही बंदोबस्त केला जात नाही. विक्रेत्यांच्या दुकानापुढे जनावरं गेल्यावर तेवढेच व्यापारी हाकतात मात्र ते फिरून पुन्हा तेवढ्याच जागेत बिनधास्त फिरतात. कारण त्यांचा कोणीच वाली नाही. ह्या मोकाट जनावरांचा बंदोबस्त होण्याची गरज आहे.
लोकप्रतिनिधींचे जनतेकडे दुर्लक्ष
नागरिकांच्या रोजमराच्या जीवनातील ही वाहतूकीच्या कोंडीचा समस्या मांडण्यासाठी अनेक माध्यमांनी मालिका लावल्या परंतू गाढ झोपलेले प्रशासनास जाग येत नाही. त्याचबरोबर लोकप्रतिनिधी एकमेंकावर चिखलफेक करण्यात व्यस्त असल्यामुळे त्यांना या समस्यकडे पहायला वेळ नाही. धुळ्यातील हा रहदारिचा गुंता कधी सुटेन असा प्रश्न उपस्थित करण्याशिवाय नागरिकांना आता तरी दुसरा पर्याय नाही….